पुणे – पीएमआरडीए हद्दीतील फक्त निवासी झोनमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्राधिकरणाच्या हद्दीत सुमारे 700 पेक्षा अधिक गावांचा समावेश होतो. दि. 2 मार्च 2022 पासून प्राधिकरणाने नागरिकांकडून बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज मागविले. मात्र, मागील 53 दिवसांपासून गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेली बांधकामे नियमित करण्यासाठी फक्त 10 अर्ज प्राधिकरणाकडे आलेले आहेत.
राज्य शासनाने गुंठेवारी अधिनयम 2001 मध्ये अलिकडेच सुधारणा केल्या आहेत. पीएमआरडीएने त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील गुंठेवारीत झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. आता दि. 31 डिसेंबर 2020 पूर्वीची बांधकामे नियमित करता येणार आहे. नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत स्थापत्य अभियंतामार्फत अर्ज दाखल करावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामधारकांनी यासाठी सातबारा उतारा, स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्थैर्य प्रमाणपत्र दाखला (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) तसेच 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे बांधकाम असल्याबाबतचा गुगल नकाशा व तसेच इतर कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. आकुर्डी येथील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू आहे.
यांना मिळणार फायदा
पीएमआरडीएने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखडा योजनेतील दाटीवाटीचे क्षेत्र सन 1997 च्या प्रादेशिक योजनेनुसार ग्रामीण भागातील निवासी झोन तर पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या 23 गावांतील गावठाण क्षेत्रातील दाटीवाटीतील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहे.
यांना मिळणार फायदा
पीएमआरडीएने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखडा योजनेतील दाटीवाटीचे क्षेत्र सन 1997 च्या प्रादेशिक योजनेनुसार ग्रामीण भागातील निवासी झोन तर पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या 23 गावांतील गावठाण क्षेत्रातील दाटीवाटीतील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहे.
दि. 31 मेपर्यंत मुदत
समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडे आहेत. या 23 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसह अन्य 700 गावांमधून बांधकाम नियमितीकरणासाठी फक्त 10 आले आहेत, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दि. 31 मे 2022 पर्यत नागरिकांना अर्ज करता येणार आहे.