पुणे – महापालिका शाळांमध्ये लवकरच शिक्षकभरती

पुणे – महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यात येणार असून, शासनाच्या “पवित्र’ या संकेतस्थळावरुन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या 90 आणि उर्दु माध्यमाच्या 25 शिक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.

राज्य शासनाने शिक्षकांच्या भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेने पालिकेच्या शाळांमधील रिक्त पदांची बिंदूनामावली तयार केली आहे. शासनाची आरक्षणांचा विचार करूनच ही पदभरती करण्यात येणार येणार आहे. “पवित्र’ या संकेतस्थळावर महापालिका सर्व माहिती देत असून, येत्या काही दिवसांतच ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे आहे.

यामध्ये उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षकांची भरती केली जाणार आहे. राज्यशासनाकडून पात्रतेनुसार निवड झालेल्या शिक्षकांची यादी महापालिकेला मिळेल. त्यानुसार नियुक्‍या करण्यात येतील, असे दौंडकर यांनी नमूद केले. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा या महापालिका स्वखर्चाने चालवत असल्यामुळे “पवित्र’ संकेतस्थळावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार नसल्याचे यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.