पुणे – चहूबाजूने वाढत असलेल्या पुण्याच्या पश्चिम-दक्षिण क्षितीजावर आकाराला येत असलेला “कुटुंब’ हा महत्त्वाकांक्षी आणि सर्व सोयींनी परिपूर्ण असा गृहप्रकल्प आंबेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रांगण बिल्डकॉन आणि लक्ष्मी डेव्हलपर्सच्या या प्रकल्पात 250 हून अधिक कुटुंबांचं स्वत:चं घर साकारण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे, तेही अगदी माफक किंमतीत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात “कुटुंब’ हा गृहप्रकल्प असूनही येथे वाहनांच्या आवाजाचा त्रास अथवा प्रदुषणाची समस्या अजिबात नाही. आंबेगाव परिसरातून हडपसर ते हिंजवडीपर्यंत सहजपणाने जाता येते. कुटुंबातील प्रत्येकाच्या दृष्टीने सोयीस्कर असलेले हे लोकेशन कूल आणि कम्फर्टेबलही आहे. आर्यन, पोद्दार, सिंहगड स्कूलसह कॉलेजेस आणि झील कॉलेज, भारती विद्यापीठ अशा शिक्षण संस्था जवळच असल्याने मुला-मुलींच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय हाकेच्या अंतरावर आहे.
नोकरी आणि व्यवसायासाठी सिंहगड रस्ता, सातारारस्ता, कोथरुड, वारजे, धायरी, नऱ्हे औद्योगिक वसाहती, कार्यालये आणि कंपन्या जवळच उपलब्ध आहेत. नांदेड सिटीमधील विकसीत होत असलेले आयटी पार्क असो की अन्य विकास प्रकल्प येथून जवळच आहेत. शिवाय भारती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आरोग्य सेवा पुरवण्यात तत्पर आहेतच.
एवढे सगळे असूनही “कुटुंब’मधले फ्लॅट्स अगदी खिशाला परवडतील, असे आहेत. 1 बीएचके फ्लॅट 32 लाखापासून, तर 2 बीएचके फ्लॅट्स 42 लाखापासून उपलब्ध आहेत; तेही सर्व खर्च, कर समाविष्ट करुन आणि कुठलेही छुपे खर्च करावे न लागता. त्यामुळे चंद्रांगण बिल्डकॉन आणि लक्ष्मी डेव्हलपर्सच्या “कुटुंब’ गृहप्रकल्पात घर घेणे, हा आजचा शहाणपणाचा निर्णय ठरणार आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क : लक्ष्मी डेव्हलपर्स 8888576878)