पुणे – निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पुणे – शिरूर मतदार संघात होणाऱ्या मतदानाची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, मतदान केंद्रांचे नियोजन आणि इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीनची (ईव्हीएम) व्यवस्था झाली आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आले. रविवारी (दि.28) अधिकारी-कर्मचारी यांना निवडणुकीचे अंतिम प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर लगेचच कर्मचारी व अधिकारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.

मतदारांची संख्या वाढल्यामुळे सहायक मतदार केंद्र निर्माण केली आहेत. शिवाय, हडपसरमध्ये 35, भोसरीत 21, शिरूरमध्ये 12 आणि आळंदीत 1 अशी 69 सहायक मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिली. मतदानासाठी आवश्‍यक ईव्हीएमनची व्यवस्था केली आहे. 4 हजार 592 बॅलेट युनिट, 2 हजार 296 कंट्रोल युनिट आणि 2 हजार 296 व्हीव्हीपॅट असणार आहेत. काही मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 920 बॅलेट युनिट, 456 कंट्रोल युनिट आणि 700 व्हीव्हीपॅटचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी 12 हजार 685 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. पैकी 3 हजार 408 कर्मचाऱ्यांना पोस्टाने मतपत्रिकांचे वितरण केले आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.