पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट

पुणे -शहरात एसटी, रेल्वे तसेच खासगी बसने शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठीचा खर्च संबंधित आस्थापना अथवा प्रवाशांनी करणे बंधनकारक असणार आहे. महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी शासनाच्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार हे आदेश काढले आहेत. 

तर खासगी बस प्रवासी कंपन्यांना 50 टक्‍केच प्रवासी क्षमता बंधनकारक असणार असून, या नियमाचे उल्लंघन झाल्यास चालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

राज्यात जिल्हाबंदी लागू असली, तरी खासगी बस, एसटी, तसेच रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या करोनाबाधितांना अटकाव घालण्यात येणार आहे. त्यासाठी हे प्रवासी ज्या स्थानकावर उतरतील, त्याच ठिकाणी त्यांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.