पुणे – पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापाचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी फेटाळला.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी 47 वर्षीय बापाला अटक केली आहे. याबाबत पीडित 13 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. मागील सात वर्षांपासून ते जुलै 2021 या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर बापाने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाला विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी विरोध केला.