पुणे – पतीसोबत राहत नसलेल्या महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेऊन महिलेवर सोन्याच्या व्यापार्यासह धान्याच्या व्यापाराने बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना कोरेगावपार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
भरत जेठामल गांधी (53, रा. एकबोटे कॉलनी) आणि दिलीप पुष्कराज ओसवाल (53, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यापार्यांची नावे आहेत. याबाबत एका 42 वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलिस अधिकारी गुन्हे निरीक्षक डी. एस. भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत गांधी हा सोन्याचा व्यापारी तर दिलीप ओसवाल हा धान्याचा व्यापारी आहे. दोघेही जण महिलेचया ओळखीचे आहेत. महिला ही पतीसोबत राहत नसल्याचा व तिच्या असाह्यतेचा फायदा गैरफायदा घेऊन त्यांनी तिच्यावर बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार मागील चार वर्षापासून सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तिच्याावर कोरेगापार्क, शिवाजीनगर येथील हॉटेमध्ये आरोपीच्या ऑफीसमध्ये, एका व्यक्तीच्या शुक्रवार पेठेतील फ्लॅटमध्ये अत्याचार केल्याचे फिर्यादी नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल होताच दोघांनाही तात्काळ कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकून रविवारी दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा अधिक तपासासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) डी. एस. भुजबळ करीत आहेत.