Corona Virus Pune : देशात करोना बाधितांच्या संख्येत पुणे दुसऱ्या क्रमांकावर

पुणे – अलीकडे झालेल्या करोनाबाधितांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीमुळे पुण्याने बंगळुरूला चार महिन्यांनी मागे टाकत करोना बाधितांच्या संख्येत दिल्ली पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत चार लाख सहा हजार बाधितांची नोंद झाली आहे. तर बंगळुरूमध्ये चार लाख चार हजार बाधितांची संख्या नोंदली गेली आहे. तर दिल्लीत सहा लाख 38 हजार बाधितांची आजवर नोंद झाली आहे.

गेले सहा दिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यात मिळून एक हजारापेक्षा अधिक बाधितांची नोंद होत आहे. पुण्यातही हजारपेक्षा अधिक बाधितांची नोंद झाली. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. दिल्ली आणि बंगळुरूत ही संख्या या दिवसांत शंभरपेक्षा कमी आहे.

दरम्यान पंजाबमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेले तीन दिवस या राज्यांत पाचशेपेक्षा अधिक बाधितांची संख्या नोंदवली गेली आहे.

शुक्रवारी तर ही संख्या 622 वर पोहोचली आहे. या राज्यात साथ शिखरावर असताना सुमारे अडीच हजार बाधितांची संख्या प्रतीदिन होती. ही पातळी अद्याप गाठली गेली नसली तरी शुक्रवारच्या बाधितांची संख्या ही डिसेंबरपासून सर्वाधिक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.