Pune rain : पुणे शहरात पावसाचा जोर ओसरला

पुणे  – शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मात्र मंगळवारपासून हा जोर ओसरला आहे. आगामी काही दिवस शहर परिसरात तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवडाभरापासून मध्यम ते जोरदार पाऊस या भागांमध्ये पडला आहे.

बंगालच्या उपसागारात निर्माण झालेले कमी तीव्रतेचे वादळ आणि अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यांच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस झाला. पावसाचे प्रमाण देखील कमी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.