Pune Railway News – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने हजर साहिब नांदेड-पुणे एक्सप्रेसच्या टर्मिनसमध्ये बदल केला आहे. पुणे स्थानकाऐवजी ही गाडी हडपसरला स्थलांतरित केल्याने गाडी क्रमांक १७६३० हजर साहिब नांदेड – पुणे एक्सप्रेस हडपसर स्थानकावर ०४:३५ वाजता पोहोचेल. तेथून पुणे स्टेशनला जाण्यासाठी प्रवाशांना गाडी क्रमांक ११४२२ सोलापूर – पुणे डेमू ट्रेन उपलब्ध आहे. ही ट्रेन हडपसर येथून ५.२५ वाजता पुणे स्टेशनसाठी सुटते. काही प्रवाशी संघटनाकडून या स्थलांतरीत टर्मिनलला विरोध केला आहे. येत्या २६ जानेवारीपासून नांदेड-पुणे एक्सप्रेसचा प्रवास पुणे स्टेशनऐजी हडपसरला संपणार आहे. ही गाडी पहाटे साडेचार वाजता हडपसर स्थानकावर येणार आहे. त्यामुळे तेथून इच्छितस्थळी जाणाऱ्या प्रवाशांना पीएमपी उपलब्ध नसून, अव्वाच्या सव्वा भाडे देऊन रिक्षाने प्रवास करावा लागू शकतो. तसेच रेल्वेने सांगितलेल्या डेमू पर्यायही प्रवाशांना त्रासदायक असून, त्यासाठी तासभर स्थानकावर बसून रहावे लागणार आहे.