पुणे – पाच नव्या संगणक प्रणालींचे सादरीकरण

‘सी-डॅक’चा फाउंडेशन दिन : विद्यापीठात रंगला कार्यक्रम

पुणे – सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) चा 32 वा फाउंडेशन दिन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयुकातील चंद्रशेखर सभागृहात उत्साहात पार पडला. या निमित्ताने औचित्य साधून “सी-डॅक’ने पाच नव्या संगणकप्रणाली विकसित करून त्याचे सादरीकरण केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी उपस्थित होते. “डीआरडीओ’चे संचालक जनरल डॉ. सुधीर कामत, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, संगणकतज्ज्ञ डॉ विजय भटकर, सी-डॅक चे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी, कार्यकारी संचालक राशीत कुमार नाथ उपस्थित होते.

“मिडास मोलेक्‍युलर डायनॅमिक्‍स ट्रॅजेक्‍टरी अनॅलिटिक्‍स ऍज ए सर्व्हिस,’ “मल्टि-क्‍लस्टर मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म,’ “श्रुतलेखन,’ “आपत्कालिन सेवा वाहन प्राधान्य प्रणाली,’ “जिस्ट-मेल,’ या पाच नवे संगणकप्रणाली आहेत. या संगणक प्रणालीचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. हेमंत दरबारी म्हणाले, “भारत डिजिटल परिवर्तनांच्या सर्वांत क्रांतिकारक टप्प्यातून जात आहे. उपलब्ध सेवांच्या सुधारणा आणि परिवर्तनामुळे आपल्या राहण्यात, सरकारशी संवाद व संपर्क साधण्यात बदल होत असल्याचे नमूद केले.

आपत्कालीन सेवा वाहन प्राधान्य प्रणालीचा उपयोग रहदारीवरून मार्गस्थ होण्यासाठी आहे. ऍम्बुलन्स आणि अग्निशमन दल अनेकदा सिग्नल जंक्‍शनवर रहदारीच्या अडथळ्यामध्ये अडकतात. परिणामी, जीवनाची हानी होते. लाल सिग्नलवर रहदारी टाळण्यासाठी वाहने पुढे जात नाहीत. ही संगणकप्रणाली आपत्कालिन सेवा वाहनांना अग्रक्रम देऊन त्यांना हिरवा सिग्नल देऊन मार्गस्थ होण्यास मदत करण्याची प्रणाली आहे. श्रुतलेखन ही प्रणाली भाषण तंत्रज्ञान मानवी आवाज ओळखण्यासाठी आणि संश्‍लेषित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जिस्ट-मेल या प्रणालीत कोणीही त्यांचे ई-मेल आयडी त्यांच्या भाषेत ठेवू शकतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.