पुणे – मतदान यंत्र हाताळताना खबरदारी घेण्याच्या सूचना

पुणे – मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुस्थितीत होण्यासाठी झोनल अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असून प्रत्येकाने आपल्या कामात दक्ष राहावे. यापूर्वीच्या निवडणुकांचा अनुभव असला तरी यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर असल्याने मतदान यंत्र हाताळणी करताना खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी दौंड तालुक्‍याचा दौरा करून लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड, पोलीस उप अधीक्षक सचिन बारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तहसिल कार्यालयात झोनल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राम यांनी इलेक्‍ट्रॉनिक व्होटींग मशीन, व्हीव्हीपॅटच्या प्रशिक्षणाबाबतची माहिती जाणून घेतली.

मतदानाची टक्‍केवारी वाढण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हाधिकारी राम यांनी या उपक्रमांतर्गत सादर झालेल्या पथनाट्याची पाहणी करून कलाकारांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसेच स्ट्रॉंग रुमची पाहणीही केली. स्थिर सर्वेक्षण पथक, आचार संहिता कक्ष आदींचीही माहिती यावेळी घेण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.