पुणे – आधिकार नसतानाही बावीस वर्षीय व्यक्तीच्या गुप्तांगावर शस्त्रक्रीया करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरला अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांनी फेटाळला. डॉ. रितेश शहा (रा. लोहगाव) असे त्या डॉक्टरचे नाव आहे.
महापालिकेतील आरोग्य विभागातील 48 वर्षीय वैद्यकीय अधिकाऱ्याने याबाबत विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ऍक़्ट 161 मधील कलम 33 आणि भादवी कलम 420 सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा याने बी.एच.एम.एस. शिक्षण घेतले आहे. त्याने दवाखान्याच्या बाहेर “डॉ. शहाज क्लिनिक’ असा बोर्ड लावला आहे. त्यावर बेकायदेशीर “जनरल फिजिशन अँड सर्जन, तसेच, स्कीन स्पेशालिस्ट अँड सेक्सालॉजिस्ट’ असे लिहले आहे.
वाघोली येथील एका व्यक्तीच्या गुप्तांगावा शस्त्रक्रीया केली. त्या तरूणाला त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ताने महापालिका आरोग्य विभागाकडे याबाबतची तक्रार दिली. त्या व्यक्तीने घाबरून 40 हजार रुपये घेतले. गुप्तांगावर शस्त्रक्रीया केली. या प्रकरणात महापालिका आरोग्य विभागाने खात्री करून पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर त्याने अटकपूर्व जमिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. शैक्षणिक अर्हता नसतानाही सर्जन आणि फिजिशियन असल्याचे दाखवून त्याने ही शस्त्रक्रीया केली आहे.
यामुळे भविष्यात पीडिताच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. सर्वसामान्यांचा डॉक्टवरील विश्वास उडेल. दाखल गुन्ह्यात वापरलेले शस्त्रक्रीयेचे साहित्य जप्त करायचे आहे. त्याच्यकडील शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जप्त करण्यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. प्रमोद बोंबटकर यांनी केली.