Pune Porsche Crash Case : पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्श अपघात प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आदित्य अविनाश सूद, आशिष सतीश मित्तल आणि अमर संतोष गायकवाड या तिघांना अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने नमूद केले की, हे आरोपी सुमारे 18 महिन्यांपासून तुरुंगात असून खटल्याची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येत आहे. Pune Porsche Crash Case : नेमकं काय आहे प्रकरण? १९ मे २०२४ रोजी रात्री अडीच वाजता कल्याणीनगरला ही दुर्घटना घडली होती. महागड्या पोर्शे कारने दोन दुचाकीस्वार संगणक अभियंत्यांना जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. Pune Porsche Case अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले, की अपघातावेळी वाहन चालवणारा आरोपी १७ वर्षांचा होता. त्याने आधी पबमध्ये मद्यपान केले होते. Pune Porsche Crash Case : Balochistan Militants Attacks : बलुचिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यामागे ‘या’ दोन तरुणींचा हात ; बीएलएने फोटो प्रसिद्ध करत दिली माहिती ३०० शब्दांचा निबंध अन् वाहतूक नियोजन करण्याची अट त्यानंतर मुलगा अल्पवयीन असल्याने येरवडा पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळात हजर केले. बाल न्याय मंडळाने त्याला वाहतूक समस्येवर ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर चौकात थांबून वाहतूक नियोजन करावे अशा अटी, शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला. अपघातानंतर १५ तासात मुलाची मुक्तता करण्यात आल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. देशभरात या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. Pune Porsche Crash Case हेही वाचा: Gold Silver Price: सोने-चांदीच्या किमतीत घसरण सुरूच ; वाचा सोने-चांदी कितीने झालं स्वस्त ?