पुणे – पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पुणे पोलिसांना तब्बल ३३ दिवसांनंतर यश आले आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ते पुणे पोलिसांच्या पथकाला सापडले आहेत.
गौतम पाषाणकर हे गेल्या २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गणेशखिंड रोडवरील आपल्या घरासमोरुन चालकाला घरी जातो, असे सांगून निघून गेले होते़ त्यांनी आपण व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी चालकाजवळ दिली होती. त्यानुसार पोलिसांनी हरविल्याची तक्रार दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक त्यांचा शोध घेत होते़ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना बातमीदारांकडून ते जयपूर येथे असल्याचे समजले़ पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे सहकारी तातडीने जयपूरला रवाना झाले़ त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये जाऊन गौतम पाषाणकर यांना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतले