पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुचाकी गाड्यांची ‘राजगर्जना’ रॅली पुणे पोलिसांनी नाकारली आहे. आज (दि. ८) शनिवारी सकाळी ११ वाजता ही रॅली आयोजित केली होती. मात्र ऐनवेळी पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली आहे. या रॅली मध्ये तब्ब्ल ५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आल्याची माहिती मनसे कडून देण्यात आली.
सदर रॅली ससून हॉस्पिटलपासून चालू होऊन, जिल्हाधिकारी कार्यालय, नरपतगिरी चौक, एमएसीबी चौक, नाना पेठ, चाचा हलवाई चौक, अल्पना टॉकीज, हमजेखान चौक, सोन्या मारुती चौक, समाधान चौक, दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून अलका टॉकीज, फर्ग्युसन कॉलेज रस्त्याने संचेती हॉस्पिटल शिवाजी महाराज पुतळा एसएसपीएमएस इथे समाप्त होईल.
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन आणि मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन हा मूळ उद्देश या रॅलीच्या आयोजनामागे आहे. असं मनसे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, उद्या (दि. ९) रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १२ वाजता मुंबईतीत विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.
#मनसे_महामोर्चा pic.twitter.com/aXp0HSpvAV
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 6, 2020