चहा बनवायचाय दूध आणायला बाहेर जाऊ का? विचारणाऱ्याला पुणे पोलिसांकडून चहाची ‘ऑफर’

पुणे – जगभरासह भारताभोवती देखील कोरोना संकटाचे काळे ढग दाटून आले असून आतापर्यंत देशामध्ये आतापर्यंत २३०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कोरोना या विषाणूचा प्रसार संसर्गाद्वारे होत असल्याने प्रसाराची साखळी तोडण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. काही अपवाद वगळता लॉक डाऊनमुळे खेडोपाड्यांपासून ते अगदी महानगरांपर्यंत सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून तरी देखील लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्या माथेफिरूंना पोलीस खाक्या दाखवत आहेत.

अशातच आज पुणे पोलिसांनी घरातून बाहेर निघण्याची परवानगी मागणाऱ्या एका व्यक्तीस हटके उत्तर दिलं आहे. त्याचं झालं असं की, शहरामध्ये राहणाऱ्या एका इसमाने पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत आपल्याला दुधाचा ‘टी’ (चहा) पिण्याची प्रचंड तलप झाली असल्याने डेअरीमधून दूध आण्याची परवानगी मिळेल काय? असा प्रश्न उपस्थित केला.  यावर पुणे पोलिसांनी, ‘आम्ही समजू शकतो की तुम्हाला ‘टी’ नसल्याने डिफिकल-‘टी’ होत आहे. मात्र तुमची सेफ-‘टी’ देखील तितकीच महत्वाची आहे.’ असं हटके उत्तर देत लॉक डाऊन संपल्यानंतर आपण एकत्र चहा घेऊयात अशी ऑफर दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.