एकता फाऊंडेशनकडून कौतुकाची थाप
हडपसर:हडपसर काळे-बोराटे नगर येथील एकता फाऊंडेशनच्या वतीने पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वेषांतर करून छडा लावणारे पोलीस महासंचालक पदक विजेते तसेच २७० विविध पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक विलास शंकर देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.
एकता फाऊंडेशनच्या वतीने सन्मानसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक २३ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उद्धवराव भोसले यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विठ्ठल विचारे पाटील होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज विभाग प्रमुख छगन इंगळे ,तसेच रामदास वाघ, युथ फाउंडेशनचे शौकत शेख, सुप्याचे माजी सरपंच भोंडवे, रमेश पोकळे, अॅड. मुजावर, शुभम भोसले, आण्णा कदम, धुमाळ साहेब, दिपक निंबाळकर, राजेंद्र घोलप, दत्तात्रय थोरात, गणेश भोसले, सुरेश थोरात, पप्पु जेधे, सुनिल बालगुडे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघराज भोईटे यांनी केले.