पुणे(प्रतिनिधी) – दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी एकाकडून ७० लाख रुपये आणि एक फ्लॅट घेतल्याप्रकरणी विशेष शाखेतील पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रौफ शेख (वय ५५) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारविरुद्ध २०१७ मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक झालेली नव्हती. गुन्ह्याचा तपास सायबर व आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. संबंधित तपास रौफ शेख करीत होते.
त्यावेळी शेख यांनी गुन्ह्यातील आरोपी आणि तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी त्यांच्याकडून ७० लाख रुपये आणि खडकी परिसरातील फ्लॅट घेतला. मात्र, त्यानंतरही शेख यांनी तक्रारदाराला अटक केली.