पुणे(प्रतिनिधी) : जाहिरातीचा फलक लावण्यास एनओसी देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकाने तब्बल 3 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
उपनिरीक्षक बसवराज धोंडोपा चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. धोंडोपा हे येरवडा वाहतूक विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहे.
याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांनी जाहिरातीचा फलक लावण्यासाठी वाहतूक विभागात अर्ज केला होता. त्यास एनओसी देण्यासाठी धोंडोपा यांनी तीन लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती.