रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिसाची आत्महत्या; पोलिसदलात खळबळ

पुणे – घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

रज्जाक महंमद मणेरी, वय २४ मूळगाव बावडा, ता. इंदापूर असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव असून ते राजगड पोलिस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते. याबाबत रज्जाक यांचे वडील व निवृत्त पोलिस कर्मचारी महंमद मणेरी यांनी राजगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार रात्रीपासून रज्जाक फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील व नातेवाईक किकवी येथे आले. त्यावेळी रज्जाक यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी खिडकीतून काठीच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता रज्जाक हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी हाताची नस कापून घेऊन नंतर गळफास घेतल्याचे दिसले. मात्र, गळफास तुटून ते जमिनीवर पडले होते. घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहीले होते.

दरम्यान, ही घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह राजगड पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.