पुणे : पोलिसांकडून दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने खुन, दरोडा व घरफोडीचे गुन्हे असलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्या चौकशीत घरफोडीचे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. या सराईतांवर अगोदर 19 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 26/3/21 रोजी भिवरी (ता.पुरंदर) गावचे हद्दीत फिर्यादी सोपान मारुती भिसे (50 रा.भिवरी ता.पुरंदर जि.पुणे) हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन कपाटामधील ठेवलेले सुमार 14 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 10,000,/- असा एकूण 5,90,000 (पाच लाख नव्वद हजार) रुपयाचा ऐवज चोरुन नेलेला होता. त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती काढून तपास करीत असताना प्राप्त झालेल्या सीसी टीव्ही फुटेजवरुन सदरचा गुन्हा हा यापूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय अवचिते यानेच केला असल्याची खात्री झाली.
त्यावरुन आरोपी अजय अवचिते याचे राहण्याच्या ठिकाणची माहिती काढून ढवळगाव ता.अहमदनगर, आलेगाव पागा ता.शिरुर, तांदूळवाडी ता.बारामती, खेंगरेवाडी ता.पुरंधर, म्हाडा कॉलनी सासवड, लोहियानगर पुणे, चिंचवड, घोरपडी, कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता. दरम्यान गुन्हे शाखेचे पथकास आरोपी अजय अवचिते व त्याचा एक साथीदार सासवड येथे येणार असल्याची खबर मिळालेवरुन वेषांतर करून त्या ठिकाणी जाऊन आरोपी अजय राजू अवचिते (27 रा.आलेगाव पागा, ता.शिरुर) व त्याचे सोबतचा साथीदार गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले (27 आलेगाव पागा, ता.शिरुर) यांना सापळा रचून ताब्यात घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.