पुणे –पीएमपीएमएल प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात बससेवेचा ग्रामीण भागात शुभारंभ केला. परंतु, सध्या दैनिक आणि मासिक पाससेवा बंद करून ग्रामीण भागातील नागरिकांची चेष्टा केली आहे. ग्रामीण भागातील पाससेवा बंद करताना शहरी भागात मात्र ती सेवा सुरू आहे,
शहरात धावणारी पीएमपीएमएलची बस मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात देखील धावू लागली. करोनामुळे एसटी सेवा आणि रेल्वे बंद करण्यात आल्याने नागरिकांची प्रवास करताना होणारी हेळसांड बंद झाली. करोना नियम शिथिल झाल्यानंतर पुणे-हडपसरकडे जाण्यासाठी पीएमपीएमएल बस पर्वणी ठरू लागली, त्यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या गावापर्यंत बस सुरू व्हावी, असा आग्रह धरला होता. बससेवा पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभपर्यंत तर राहू-पिंपळगाव मार्गे पारगाव वाळकीपर्यंत धावू लागली आहे. मात्र, दैनिक पाससेवा 70 रुपये तर मासिक 1400 रूपये ही सुविधा दि. 1 एप्रिलपासून बंद केल्याने ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त होत आहे.