पुणे: पुण्यातील हडपसर भागात एका गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. हंडेवाडी-होळकरवाडी रस्ता येथील प्लॅस्टिकच्या गोडाऊनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यासह पीएमआरडीएच्या दोन, एमआयडीसीच्या दोन तर खासगी 4 पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले होते.