पुणे : तब्बल सव्वा दोन वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पेशवे साहसी खेळ उद्यान उद्या ( रविवार) पासून पुन्हा चिमुकल्यांनी गजबजाणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत हे उद्यान उन्हाळ्याच्या सुट्टी साठी खुले केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली. मात्र, या उद्यानाचे प्रमुख आकर्षण असलेल्या फुलराणीचे अद्याप देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने फुलराणी सफरीसाठी पुणेकरांना आणखी आठवडाभर प्रतिक्षा करावी लागणार आहे.
करोनाचे निर्बध शिथिल झाल्यानंतर शहरातील जवळपास 90 टक्के उद्याने सुरू करण्यात आली असली तरी अद्याप पेशवे पार्क बंद होते. ते सुरू करण्याची मागणी केली जात होती.