पुणे – वाढते अपघात आणि वाहनचालकांची बेशिस्त लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन विभागाने दंडामध्ये यापूर्वीच दुपटीपेक्षा जास्त वाढ केली. मात्र, तरीही वाहनचालक नियम मोडत आहेत. पोलिसांनी कारवाई केल्यास दंडाची रक्कम पाहून हुज्जत घालतात. यावर वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम ट्वीट करत वाहनचालकांना नियम न मोडण्याचे आवाहन केले आहे.
नो पार्किंगमध्ये दुचाकीसाठी पहिल्यांदा टोइंगसह 875 रुपये, चारचाकी चालकांना एक हजार 71 रुपये दंड आकारण्यात येत आहेत. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास अनुक्रमे एक हजार 71 रुपये आणि दोन हजार 71 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहनचालकांनी वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
कारवाई सुरू
सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारखे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.