पुणे – अनुकंपावरील शिक्षकांचे वेतन लवकरच सुरू

पुणे – अनुकंपा तत्त्वावर नियुक्‍ती देण्यात आलेल्या शिक्षकांना तत्काळ शालार्थ आयडी देऊन त्यांचे वेतन सुरू करण्यात येणार आहे, असे शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी शिष्टमंडळासह नुकतीच शिक्षण आयुक्‍तांची भेट घेतली व त्यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. शिक्षकांना वैयक्‍तिक मान्यता मिळूनही शालार्थ आयडी मिळत नसल्याने त्यांना अनेक वर्षांपासून वेतनापासून वंचित राहवे लागले आहे. अनुकंपा तत्त्वावर नियुक्‍त झालेल्या विधवा महिला, पीडित शिक्षक व शिक्षिका यांची वेतन मिळत नसल्याने आर्थिक अवस्था बिकट बनली आहे. या शिक्षकांच्या वेतनांचा प्रश्‍न त्वरित न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिरसाट यांनी दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शालार्थ आयडी मिळाले नसल्याबाबतची सुमारे अडीच हजार जणांचे प्रस्ताव शिक्षण आयुक्‍त स्तरावर प्रलंबित पडले आहेत. तसेच क्षेत्रीय स्तरावर सुमारे दीड हजार जणांचे प्रस्ताव दाखल करून घेण्यात आले नसल्याची बाब शिरसाट यांनी आयुक्‍तांकडे मांडली आहे. आयुक्‍तांनी त्याची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याची कार्यपद्धती 8 दिवसांत निश्‍चित करण्यात येणार आहे. ही सर्व प्रंलबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जलद गतीने कामकाज पूर्ण करावे, असे आदेशही शिक्षण आयुक्‍तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजाविले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)