पुणे – मध्य रेल्वेंतर्गत धावणारी पनवेल एक्स्प्रेस पुन्हा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाकडून देण्यात आली. पुणे-मुंबई मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यान सुरू असणाऱ्या तांत्रिक कारणांमुळे 26 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधील दररोज धावणारी पुणे-पनवेल-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे.
तर पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस 26 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मागील चार ते पाच महिन्यांपासून या मार्गावरील रेल्वे गाड्या बंद होत्या. प्रशासनाकडून या मार्गाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात गाडी अनेक महिन्यांपासून बंद ठेवली आहे. यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे.