पुण्यातील ‘त्या’ २२ भागांमध्ये बँकांना कामकाज बंद ठेवण्याचे आदेश

पुणे (प्रतिनिधी) – शहरातील करोनाबाधित २२ भागात पोलिसांकडून कठोर निर्बंध जाहीर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या भागातील बँकांनी त्यांच्या शाखा बंद ठेवाव्यात असे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी बुधवारी दिले.मात्र,कठोर निर्बंध असलेल्या भागातील बँकांची एटीएम केंद्रे पूर्णक्षमतेने कार्यान्वित ठेवावीत, अशी सूचना त्यांनी केली.

साथरोग अधिनियम १८८७ मधील तरतूद तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ नुसार शहर आणि परिसरातील बँकांना कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.कठोर निर्बंध असलेल्या भागातील बँकांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावेत.मात्र, एटीएम केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावीत, असे आदेश डॉ. शिसवे यांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.