पुणे – परीक्षा केंद्र न दिलेल्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था

पुणे – बी.एड. व एम.एड. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 11 महाविद्यालयांना परीक्षा केंद्र विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार देण्यात आलेले नाही. येथील विद्यार्थ्यांची अन्य महाविद्यालयात आसनव्यवस्था अन्य परीक्षा केंद्रात करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्याची जबाबदारी परीक्षा केंद्र न दिलेल्या महाविद्यालयांची राहील, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.

एप्रिल-मे 2019 मध्ये बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहे. यासाठी पुण्यातील 11 महाविद्यालयांना परीक्षा केंद्र देण्यात आले नाहीत. त्याचप्रमाणे नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही महाविद्यालयांनाही परीक्षा केंद्र न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अन्य महाविद्यालयांत जावे लागणार आहे. त्याची यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेची बैठकव्यवस्था कोणत्या ठिकाणी आहे, त्याची माहिती देण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर राहील.

पर्यायी आसनव्यवस्था केलेल्या महाविद्यालांची नावे :

एम.जी.एम आझम शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अरिहंत कॉलेज ऑफ एजुयकेशन, पूलगेट. डॉ. डी. वाय. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पिंपरी. शारदाबाई पवार कॉलेज ऑफ एज्युकेशन शारदानगर, बारामती. ज्ञानेश्‍वर ग्रामोन्नती मंडळाचे, जाधव महाविद्यायल, आळे. श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर.

पुण्यात परीक्षा केंद्र न दिलेल्या कॉलेजची नावे : पी.एम.ई. ट्रस्टचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, कोंढवा. गार्डियन कॉलेज ऑफ एज्युकेशन, कोंढवा. विश्‍वशांती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोणी काळभोर. अरिहंत इन्स्टिट्यूट ऑफ टीचर ट्रेनिंग, बावधन.

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, आकुर्डी. सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोमेश्‍वरनगर. ग्रामोन्नती मंडळाचे शिक्षणशास्त्र कॉलेज, नारायणगाव. विमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन, डुंबरवाडी. शरद कॉलेज ऑफ एज्युकेशन, राजुरी. जय बजरंग प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, आळेफाटा. शिवनेरी अध्यापक महाविद्यालय, खानापूर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.