पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे शनिवारी कोविशील्डच लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, 185 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशील्डचे 100 डोस उपलब्ध असतील.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डच जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 40 टक्के लस ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
30 एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शनिवारी 20 टक्के लस ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट दुसरा डोस दिला जाईल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे, असे मनपा आरोग्य विभागाने सांगितले.