पुणे – वनमहोत्सवासाठी उद्दिष्टाच्या केवळ ३०% वनविभागाची तयारी

पुणे – राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या वनमहोत्सवासाठी वनविभागातर्फे सातत्याने तयारी चालू असून, विभागातर्फे वृक्षारोपणासाठी आतापर्यंत तब्बल 3,242 साइट्‌सची निवड करण्यात आली आहे, तर सुमारे 74 लाख 29 हजार 982 खड्डे खणण्यात आली आहे. मात्र अद्यापही एकूण तयारीच्या केवळ 30 टक्केच तयारी झाली आहे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या वनमहोत्सव उपक्रमांतर्गत यंदा राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत पुणे विभागासाठी दोन कोटी 90 लाख 53 हजार 650 इतके वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे तर केवळ पुणे जिल्ह्यासाठी 76 लाख 2800 इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत वनविभाग आणि वनविभागेत्तर विभागांचे मिळून सुमारे 3,242 साइट्‌सची निवड करण्यात आली आहे. तसेच वृक्ष लागवडीसाठी 74 लाख 29 हजार 982 खड्डे देखील खणण्यात आले आहे.

वनविभागातर्फे यासाठी जुन्नर, दौंड, इंदापूर, बारामती अशा तालुकयांमधील साइट्‌स निवडण्यात आल्या आहेत. तर वनविभागेत्तर विभागांमध्ये मध्ये सर्वाधिक साइटस या शेतीसाठी असलेल्या साइटस आहेत. याव्यतिरिक्त, सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, राज्य आणि केंद्र शासनाचे सर्व विभाग, शिक्षणसंस्था अशा सर्वच शासकीय कार्यालयांनीदेखील आपल्याकडील साइट्‌सची निवड केली आहे. मात्र अद्यापही अपेक्षेनुसार कामे पूर्ण झाली नसून एकूण कामाच्या केवळ 30टक्केच कामे झाली असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात या कामांची गती वाढविण्याचे आव्हान वनविभागासमोर असणार आहे.

पुणे विभाग गेल्यावर्षीही उद्दिष्टपूर्तीत “फेल’:
वनमहोत्सवांर्गत 2018 साली तेरा कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावेळी पुण्यासाठी 71 लाख 14 हजार 285 रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र 45 लाख 57 हजार 727 इतकीच लागवड करण्यात आली आहे. एकूणच दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ 64 टक्केच लाववड झाली होती. एकूणच गतवर्षी देण्यात आलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात पुणे विभागाला अपयश आले होते. यंदा ही परिस्थिती बदलेल का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.