पुणे – ऑनलाईन एमएचटी सीईटी वेळेत पोहचा अन्यथा सीईटीला मुकाल!

पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा 2 मे 13 मे रोजी होत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने आज सायंकाळी प्रसिद्ध केले आहे. वेळेत पोहचा. उशिरा येणाऱ्यास प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

एमएचटी सीईटी यंदा प्रथमच ऑनलाईनद्वारे होत आहे. “पीसीएम,’ “पीसीबी,’ आणि “पीसीएमबी’ या ग्रुपच्या स्वतंत्रपणे परीक्षा होणार असून, त्याच्या तारखा आणि वेळ जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा दोन सत्रात होत आहे. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 12, तर दुसरे सत्र दुपारी 2 ते सांयकाळी 5 या वेळेत परीक्षा होणार आहे. ग्रुपनिहाय परीक्षेचे कालावधी निश्‍चित करण्यात आले.

सकाळी 9 वाजता होणाऱ्या परीक्षेला 7.30 वाजता उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार 8.30 वाजता बंद केले जाईल. विद्यार्थ्यांची पहिले लॉगीन 8.45, तर दुसरे लॉगीन 9 वाजता होईल. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेला सुरूवात होणार आहे. ग्रुपनिहाय होणाऱ्या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थिती लावणे बंधनकारक आहे. एकदा परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार नाही, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.