पुणे – कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आता “फिल्ड वर्क’

पुणे – अग्निशमनदलासाठी आवश्‍यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही प्रत्यक्षात फिल्डवर काम करण्याऐवजी कार्यालयात काम करणाऱ्या 26 कर्मचाऱ्यांना अग्निशमनदलाच्या वर्दीचे काम सोपविण्यात यावेत असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या विभागासाठी कर्मचारी संख्या अपुरी असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

सुमारे 40 लाख पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अग्निशमनदलासाठी सुमारे 960 पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात या विभागाकडे केवळ 444 कर्मचारीच कार्यरत असून 14 अग्निशमन केंद्रांवर 3 शिफ्टमध्ये प्रत्येकी 21 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, ही संख्या अतिशय नगण्य आहे. ही बाब लक्षात घेऊन या विभागाकडून वारंवार पदभरती करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अग्निशमनदलासाठी सेवा प्रवेश नियमावली राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पडून असल्याने अद्याप कोणतीही नवीन भर्ती झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून या विभागासाठी लवकरच 50 कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या शिवाय, सध्या फायरमन म्हणून अग्निशमनदलाच्या सेवेत कार्यरत असलेले सुमारे 26 कर्मचारी या विभागाच्या कार्यालयात कार्यलयीन कामकाज सांभाळत आहेत, प्रत्यक्षात त्यांनी जे प्रशिक्षण घेतले आहे ते काम करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रत्येक केंद्रावर नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या केंद्रांना प्रत्येकी 2 नवीन कर्मचारी उपलब्ध होणार असून आवश्‍यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या काही प्रमाणात का होईना पण वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)