पुणे – कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध नसल्याने सोमवारी लसीकरण होणार नसल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.
करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गेल्या आठवड्यात सुरू ठेवण्यात आली होती. सुमारे 190 पेक्षा जास्त केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवले होते. सध्या महापालिकेने दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रीत केले आहे.
पहिला डोस सुमारे 70 टक्के नागरिकांनी घेतला आहे; मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 22 ते 25 टक्क्यांच्याच घरात आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसवर महापालिकेने सध्या भर दिला आहे.