पुणे : ‘खासगी वाहनात मास्क नको”; नगरसेविका मंजुषा नागपूरे यांची मागणी

पुणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे शहरातही खासगी वाहनातून एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना विनामास्क मुभा द्यावी अशी मागणी नगरसेविका मंजुषा नागपूरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. यात वाहनांमधून प्रवास करतानाही मास्क वापरणे बंधनकारक आहे. आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने मुंबई महानगरपालिकेने नियमावलीत शिथिलता देवून खाजगी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरणे सक्तीचे नाही असे सुचवून दंड आकारू नये असे निर्देश दिले आहेत.

याच धर्तीवर आपणही नियमावलीत शिथिलता द्यावी आणि खाजगी वाहनातून विना मास्क प्रवास करणाऱ्यांकडून दंड आकारू नये. मात्र सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहनांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक ठेवावे अशी मागणीही नागपूरे यांनी या पत्रात केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.