पुणे : उद्यापासून लॉक डाऊन नाही मात्र ‘हे’ निर्बंध कायम

पुणे – शहरातील १० दिवसांच्या लॉक डाऊनची मुदत आज मध्यरात्री पूर्ण होत असून पुण्यात उद्यापासून (२४ जुलैपासून) लॉक डाऊन नसणार आहे. लॉक डाऊनची मुदत संपत असली तरीही काही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केलेल्या आदेशांनुसार केंद्र शासनाच्या कोविड १९ च्या नियंत्रणाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्देश लागू असतील असं  स्पष्ट करण्यात आलंय.

हे निर्बंध कायम                                                                                                                    महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. ६५ वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. २४ जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत.

आदेशात आणखी काय?
प्रतिबंधित क्षेत्रात विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती, गृह निर्माण संस्था या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विशिष्ट क्षेत्र, चाळ, वसाह, इमारत किवा गृहनिर्माण सोसायटी येथे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.