पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत “कोविशील्ड’ लस उपलब्ध नसल्याने सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी “कोवॅक्सिन’ लसीचेच सेशन्स महापालिकेने उपलब्ध करून दिले आहेत. सहा केंद्रांवर हे लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रत्येक केंद्रांवर 300 डोस उपलब्ध आहेत.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना बुधवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 20 जूनला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना बुधवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
कोवॅक्सिनचे डोस मिळण्याची केंद्रे
- येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
- कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
- कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
- गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
- महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
- ससून सर्वोपचार रुग्णालय