Pune News : मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सदस्य अमित आबा घुले यांना ग्रामस्थांनी व मतदारांनी नेहमीच भरभरून साथ दिली आहे. त्याचप्रमाणे या महापालिका निवडणुकीत मतदारांनी आपल्यालाही साथ देत निवडून दिले आहे. मतदारांचे आपण चिरऋणी असून मांजरी–केशवनगर–साडेसतरानळी–शेवाळेवाडी प्रभाग क्रमांक १५ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगरसेविका सारिका अमित घुले यांनी केले. भाजपच्या सर्व वरिष्ठ नेतेमंडळी, मंत्री, आमदार तसेच स्थानिक नेत्यांशी चर्चा करून प्रभागाच्या विकासाचे स्पष्ट व्हिजन ठरविण्यात येणार असून, त्यामध्ये मतदारांचा मोलाचा सहभाग असणार आहे. मतदारांनी सुचवलेली प्रत्येक विकासकामे मार्गी लावण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधून सुमारे २६,१४८ मते मिळवत तब्बल ८,७७६ मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्या वेळी नागरिकांशी संवाद साधताना नगरसेविका सारिका घुले यांनी ही माहिती दिली. Sindhudurg District : भाजपचा बिनविरोध पॅटर्न कायम! निवडणुकीपूर्वीच उधळला विजयाचा गुलाल या प्रभागातील केशवनगर, साडेसतरानळी, महादेवनगर, शेवाळेवाडी तसेच मांजरी बुद्रुक गावातील प्रत्येक कुटुंबाशी आपले सासरे ज्ञानेश्वर घुले, पती अमित घुले व दिर तुषार घुले यांचे जुने आणि आपुलकीचे संबंध आहेत. आपल्यालाही या परिसरातील नागरिकांशी नेहमीच आपुलकी असून मतदारांनी दाखविलेला विश्वास आपण विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभागातील प्रत्येक मतदाराचे प्रभागाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्याचा आपला निर्धार आहे. या विजयामध्ये स्थानिक आमदार, नेते, कार्यकर्ते व मतदारांचे मोठे योगदान असून त्यांच्या सहकार्यामुळेच हा विजय शक्य झाला आहे. त्यामुळे त्यांचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे. जनतेने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली असून, दाखविलेला विश्वास कायम स्मरणात ठेवून विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन सारिका अमित घुले यांनी दिले आहे. हेही वाचा: Mumbai Crime News : धक्का लागल्याचा राग की आणखी काही ? प्राध्यापकाला संपवणाऱ्या आरोपीला बेड्या; मुंबईतील धक्कादायक घटना