पुणे – कोरोना काळात कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेकांचे प्राण वाचविले. याशिवाय त्यांच्या पुढाकारानेच मतदारसंघातील लष्कराच्या पटेल रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधाही सर्वसामान्यांना उपलब्ध झाल्या.
मतदारसंघात वेळोवेळी वैद्यकीय उपचारांसाठी महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळत असल्याने आमदार सुनील कांबळे हे आमच्यासाठी आरोग्यदूत असल्याच्या भावना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केल्या.
कांंबळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रस्ता ते लडकतवाडीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या वेळी मतदारांनी या भावना व्यक्त करून कांबळे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
या पदयात्रेस युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महायुतीमधील राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड, राष्ट्रवादी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) चे बाळासाहेब जानराव,
शहर अध्यक्ष संजय सोनवणे, महेंद्र कांबळे, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष संदीप धांडोरे, भाजपा कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सुशांत निगडे , नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती,
रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती आदी संघटना आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मागील पाच वर्षांत मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण, मोफत आरोग्य शिबिरे, शासनच्या आयुष्यमान भारत योजनेसह, धर्मादाय रुग्णालयांत नागरिकांना उपचारासाठी भरीव मदत करता आली. भविष्यात हे काम आणखी सक्षमपणे करण्यावर आपला भर राहणार आहे.
– सुनील कांबळे, महायुतीचे उमेदवार