Pune News | बुधवारी दोन लोकल रद्द; एक्‍स्प्रेसही उशिराने

पुणे, दि. 6 – देहूरोड आणि आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक कामासाठी सव्वाआठ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजून 55 मिनिट आणि सायंकाळी 5 वाजून 80 मिनिटाची लोणावळा-पुणे लोकल रद्द केली आहे. हा ब्लॉक बुधवारी सकाळी 8 वाजून 5 मिनिट ते सायंकाळी 4.15 या वेळेत ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानी दिली.

तसेच, दौंड-इंदूर एक्‍स्प्रेस (02943) नियोजित वेळेनुसार, दुपारी दोन वाजता दौंड स्थानकातून सुटेल. मात्र, पुढील प्रवासात पावणेदोन तास विलंबाने धावणार आहे. यासह कोल्हापूर-मुंबई, बेंगळुरू-मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस “मदुरई एक्‍सप्रेस’ या गाड्या एक तास उशिराने धावणार आहेत. तर, मुंबई-भुवनेश्वर एक्‍सप्रेस 20 मिनिटे आणि मुंबई-हैदराबाद एक्‍सप्रेस 15 मिनिटे उशीराने धावणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.