पुणे : आरोग्यदूत आमदार सुनिल कांबळे यांच्या जन्मदिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या सहकार्यातून तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डचे नगरसेवक दिलीप गिरमकर यांच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात कॅम्प भागातील नागरिकांनी वैद्यकीय उपचारचा लाभ घेतला. आमदार कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित या शिबीरात नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, इसीजी, तसेच इतर आजारांच्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या.
तसेच या तपासणीत गरज असलेल्या रूग्णांची मोफत तपासणी केली असून मोठया आजारांचे निदान झाल्यास शिबिरानंतर मोफत शस्त्रक्रीया करण्यास मदत केली जाणार आहे. या शिवाय, शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभही देण्यात येणार आहे. या शिबीरात या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी विशेष लाभ घेतला.
हिंद तरुण मंडळ ट्रस्ट येथे आयोजित या शिबिरात डॉ.प्रमोद खराडे, डॉ. आस्था सचदेव, डॉ. शंकर मुगावे, संदीप खरात, आदेश जिरे, डॉ. अनुप, प्रशांत ढवळे यांच्यासह श्रावणी कोठारे, जीवन भगत, सुनील बाथम, प्रशांत पवार, संजय भोपे, प्रीतम पालरेच्या नितीन बत्तेल्लू, गणेश तिप्पापूरकर, सुरेश बत्तेल्लू , विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे सिद्धार्थ गिरमे यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य शिबिराच्या संयोजनाबाबत विशेष आभार मानले.