हर्षद कटारिया
सहकारनगर – टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय शेजारीच महानगपालिकेच्या जागेत वाचनालयाच्या नावाखाली हॉटेल व पान टपरी सुरू असून त्याचे गौडबंगाल मात्र गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न पालिकेचे अधिकारी करत आहेत.
सदर जागा ही विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मध्ये येते. पर्वती मतदार संघात पदपथावर वाचनालय टाकून राजकीय ताबे टाकण्याची कामे जोर धरत असतानाच आता मात्र वाचनालयाच्या नावावर हॉटेल चालविणे म्हणजे अनधिकृत व बेकायदेशीर कामाचा उच्चांक म्हणावा लागेल.
महानगपालिका कार्यालया शेजारीच असे अनधिकृत प्रकार सुरू असताना कोणत्या संगनमतामुळे अधिकारी लपवा लपवी करत आहेत हे मात्र समजत नाही.
भाजपची सत्ता असलेल्या पुणे महानगपालिकेत अतिक्रमण विभाग झोपलाय की झोपेचे सोंग घेतोय असा प्रश्न निर्माण होतो.
पालिकेचे अधिकारी हे काम पालिकेच्या खर्चातून केलेले नसल्याचा सूर लावत असले तरी स्थानिक नगरसेवक स्वतःच हे काम माझ्याच वार्ड स्तरीय निधीतून केल्याचे ठाम पणे सांगत आहेत त्यामुळे भविष्यात कोणाचे पितळ उघडे पडणार हे समजेलच.
सदर काम होण्यासाठी पक्षातील सत्ताधारी वरिष्ठ नेत्यांचे फोन आले होते अशी अंतर्गत माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र पर्वती मतदार संघात पक्षाच्या रंगाचे बोर्ड लावून वाचनालये, मदत केंद्रे , नागरी सुविधा केंद्रअशी केविलवाणे नावे देऊन महानगपालिकेच्या जागेवर ताबे टाकून जागा ताब्यात घेण्याचे प्रकार सर्व श्रुत असताना वाचनालयात हॉटेल त्या बाहेर पदपथावर पान टपरी अशी प्रगतिशील अनधिकृत कामे सत्ताधार्यांन कडून होत असताना प्रशासकीय अधिकारी मात्र मूग गुळून गप्प आहेत.
पदपथावर अतिक्रमण असल्याने येथे पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते. यावर अतिक्रम विभागाचे अधिकारी आता तरी काही कारवाई करणार का हे पाहावे लागेल.
टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय शेजारी वाचनालयाच्या नावाने सुरू झालेल्या हॉटेलच्या अतिक्रमण समोरच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय आहे मात्र या पक्षातील नेत्यांनी सुद्धा माहिती घेऊन सांगतो असे प्रशासकीय उत्तर दिले. विरोधकांच्याच अश्या प्रतिक्रिया मुळे अनेक प्रश्न नागरिकानं समोर उभे राहतात???
सदर जागी नागरिकांच्या हितासाठी वाचनालय बांधण्या साठी माझ्या वार्ड स्तरीय निधी तुन अंदाजे चार लाख रुपये खर्च करून वाचनालय बांधले होते त्या जागी झालेले हॉटेल व पाण टपरी चे अतिक्रमण तातडीने काढून टाकण्यासाठी महानगपालिकेत पाठपुरावा करणार आहे. झालेले अनधिकृत अतिक्रमण चुकीची व बेकायदेशीर बाब आहे.
– रघुनाथ गौडा, नगरसेवक भाजप
—-
सदर जागी बांधलेल्या वाचनालयास क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोणताही निधी खर्च करण्यात आलेला नसून त्याजागी हॉटेलचे सुरू असणे चुकीची बाब आहे त्या बाबत तातडीने माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
– आशिष महाडदळकर, सहाय्यक आयुक्त विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय.