पुणे : मागील अडीच वर्षांपासून महालिकेवर प्रशासकराज आहे. त्यामुळे, शहरातील सर्व कारभार प्रशासनाकडून सुरू असून कामे होत नसल्याने नागरिकांकडून मोठया प्रमाणात तक्रारी केल्या जात आहेत.
याचा परिणाम, पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीतही दिसून आला असून कामे होत नसल्याने नागरिकांकडून मतदान केले जात नसल्याचे समोर आले आहे.
परिणामी, महापालिका अधिकाऱ्यांंनी शहरात मोठया प्रमाणात जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांंनी सर्व उपायुक्तांंना दिले आहेत.
त्यासाठी, मागील विधानसभा निवडणूक तसेच लोकसभा निवडणूकांंच्या आकडेवारीचे विश्लेषण करून ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान झाले आहे त्या केंद्रावर लक्ष केंद्रीत् करावे अशा सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
त्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विशेष जनजागृती मोहीम राबवावी, पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान करावे यासाठी त्यांना सूचना द्याव्यात, महाविद्यालये तसेच खासगी अस्थापनांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.