वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे महिलांसाठी वुमन्स क्रिकेट प्रीमियर लीग 2025 चे आयोजन रत्नमाला संदीप सातव व संदीप सातव यांच्या वतीने करण्यात आले होते. या महिलांसाठीच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीने क्रिकेट स्पर्धेमध्ये मोठा उत्साह संचारला.
वाघोलीत पहिल्यांदाच होत असलेल्या वुमन्स क्रिकेट लीग 2025 चा आज उद्घाटन समारंभ पार मोठ्या थाटात संपन्न झाला. महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून महिला क्रिकेट स्पर्धा व क्रीडा स्पर्धक यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा तसेच महिलांना क्रिकेट खेळण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे संदीप सातव, रत्नमाला सातव यांनी सांगितले. मंत्री महोदयांनी या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेट खेळून करून महिलांचे सहभागाबद्दल कौतुक केले.
यावेळी, दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल दादा कुल, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, उपाध्यक्ष युवा मोर्चा निवेदिता एकबोटे, सुशील मेंगडे, अमृत मारणे, महेंद्र भाडळे हे देखील उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी अनेक महिला भगिनी विशेष प्रयत्न करत असल्याने उपस्थित मान्यवरांनी त्या महिलांचे गोड कौतुक करून क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महिलांसाठीच्या क्रिकेट स्पर्धेची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियात चर्चा..
वाघोली मधील गृहिणी, कामगार, कारखानदार, तसेच युवती, शाळा कॉलेजमधील विद्यार्थिनी आदींनी जवळपास महिनाभर या क्रिकेट स्पर्धेसाठी आपापल्या भागांमध्ये सराव केला आहे. हा सराव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्व समावेशक महिलांसाठी असणारी ही क्रिकेट स्पर्धा वाघोलीत मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे.
नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात महिला अधिक प्रमाणात पुढे येत आहेत. मात्र क्रीडा क्षेत्रात देखील महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आगामी काळात विशेष प्रयत्न करेल”
– जयकुमार गोरे (ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य)