पुणे – महापौर मुरलीधर मोहोळ यांचा करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, मात्र, महापौराच्या अंगरक्षकाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस काळजी घेण्याचा आणि गर्दी पासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी महापौर मोहोळ यांना दिला आहे.
तीन दिवसापूर्वी महापौरांचा नजीकचा कार्यकर्ता करोना बाधित आढळला आला होता. त्यामुळे महापौरासह त्यांचा अंगरक्षक जवळच्या संपर्कात असल्याने महापौर आणि अंगरक्षकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून महापौराचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर त्यांच्या अंगरक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.