पुणे – शहरातील बावनधन परिसरातील एका इमारतीमध्ये असलेल्या फोटो स्टुडिओला रविवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात जवानांना यश आले. या आगीत स्टुडिओतील साहित्य जळून खाक झाले आहे.
सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बावधनमधील शिंदेनगर येथे एका दुकानामध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्याक्षणी कोथरुड, वारजे, पाषाण, औंध, एरंडवणा अग्निशमन केंद्रातून घटनास्थळी पाच वाहने रवाना करण्यात आली. संबंधित ठिकाणी पाच मजली इमारत असून त्यातील एका फोटो स्टुडिओला आग लागून मोठ्या प्रमाणात धुर बाहेर येत होता.
स्टुडिओमध्ये फ्लेक्स, फोटो फ्रेम व इतर साहित्य होते. रौद्र रूप धारण केलेल्या या आगीत स्टुडिओमधील हे साहित्य जळून खाक झाले. तर, तेथील तीन सदनिकांना आगीची झळ बसून नुकसान झाले आहे. इमारतीत धुरामध्ये अडकलेल्या ७ नागरिकांना अग्निशमनदलाच्या जवानांनी बाहेर काढले.
त्यांना प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केले आहे. जवानांनी चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा करून काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी पाच मजली इमारत असून येथे असणाऱ्या एका फोटो स्टुडिओला (फ्लेक्स, फोटो फ्रेम व इतर साहित्य) आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता.
त्याचबरोबर तेथील तीन सदनिकांना ही आगीची झळ बसली असून नुकसान झाले आहे. तसेच, धुरामध्ये अडकलेल्या ७ नागरिकांना जवानांनी बाहेर काढून प्राथमिक उपचारा करिता रुग्णालयात रवाना केले आहे. आगीवर चार ही बाजूने पाण्याचा मारा सुरु ठेवत सद्यस्थितीत वेळ ०६•४५ वाजता आगीवर पुर्ण नियंत्रण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.