पुणे- पुण्यातील कोहिनूर ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल यांचा १ ऑगस्ट रोजी मुंबईतील फोर सीझन्स हॉटेलमध्ये आयोजित झालेल्या एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिअल इस्टेटमधील महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
कोहिनूर हा पुण्यातील सर्वात मोठा बाधकाम क्षेत्रातील नाव असून ,पर्यावरणपूरक निवासी व व्यापारी संकुले उभारण्यावर त्यांचा भर असतो. पुणे शहरात सुमारे १ कोटी चौरस फुटाचे बांधकाम त्यांचे चालू आहे. आत्ता पर्यंत कोहिनूर ग्रुपला राज्य व देश पातळीवर अनेक पुरस्कारांनी सम्मानितआले आहे.