पुणे : गणेशोत्सवात शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना मध्यभागात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार ५ ते १८ सप्टेंबर कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून,
वाहन चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. गणेशोत्सवात नागरिकांसह वाहन चालकांनी एकमेकांना सहकार्य करून उत्सव निविर्घ्नपणे पार पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरातील मध्यभागात ५ ते १८ सप्टेंबर कालावधीत सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः व्यापारी, उद्योजकांनी आपली जड वाहने शहराबाहेर अनलोड करावी.
त्यानंतर छोट्या वाहनातून साहित्य मध्यभागात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित जड वाहन चालकांनी मध्यभागात वाहने आणू नयेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चौकट- जड वाहनांना बंदी घातलेले रस्ते
शास्त्री रस्ता- सेनादत्त चौकी ते अलका चौक
टिळक रस्ता- जेधे चौक ते अलका चौक
कुमठेकर रस्ता- शनिपार ते अलका चौक
लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते अलका चौक
केळकर रस्ता- फुटका बुरूज ते अलका चौक
बाजीराव रस्ता- पुरम चौक ते गाडगीळ पुतळा
शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
कर्वे रस्ता- नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन रस्ता – खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक
सिंहगड रस्ता- राजाराम ब्रीज ते सावरकर चौक
मुदलियार रस्ता-गणेश रोड- पॉवरहाउस -दारूवाला- जिजामाता चौक- फुटका बुरूज चौक परिसरात जड वाहनांना बंदी घातली आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ५ ते १८ सप्टेंबर कालावधीत नागरिकांनी जड वाहने शहरात आणू नयेत. गणेशभक्तांसह उत्सव मंडळांना सहकार्य करून वाहतूककोंडी टाळण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा