हडपसर – हडपसर परिसरातील धोकादायक उड्डाणपुलाच्या कामाला महापालिकेने दुरुस्ती करिता दोन दिवस पुल बंद ठेवण्यात आला असुन, या उड्डाणपुलाचे एकेरी मार्गाचे प्रथम पुणे ते सोलापुर मार्ग दुरुस्तीसाठी बंद आहे तरी, वाहनचालक व नागरीकांनी सहकार्य करावे,तसेच पर्यायी मार्ग वापरावेत असे आवाहन पालिका व वाहतुक विभागाने केले आहे.
सोलापूर आणि सासवड रोडच्या दिशेने जाणारा,दि.११ व व १२ रोजी बंद ठेवण्यात आला आहे. मागील एक वर्षापुर्वी हडपसर उड्डाणपूल हादरे बसत असल्याचे कारणावरुन नागरिकांनी महापालिकेच्या निदर्शनात आणून दिले होते,त्यावेळी पुल दुरुस्त केला,माञ आज एक वर्ष उलटुन गेले तरी,उड्डाणपुलाची स्थिती पाहण्यासाठी व दुरुस्तीसाठी दोन दिवस महापालिकेने उड्डाणपुलावर एकेरी जड वाहनास जाण्यास बंदी केली आहे
दरम्यान दुरुस्तीच्या कामानिमित्त महापालिकेने दोन दिवस कालावधीसाठी सोलापुरच्या दिशेने उड्डाणपूल बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे शहर वाहतूक विभागाने सोलापूर रोड व सासवड रोडच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. यासाठी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार यांनी दिल्या आहेत,
हडपसर उड्डाणपूल अनेक ठिकाणी हादरा बसत आहे, त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने उडडाणपूलाची दुरुस्तीकरिता पूल बंद ठेवणे गरजेचा आहे, हडपसर उड्डाणपुलावरून सोलापूर रोड व सासवड पंढरपूर रोड या दोन राष्ट्रीय महार्गावर वाहने जातात, त्यामुळे पुल दुरुस्ती कालावधीत पुलच्या खालील रस्तावरुन वाहने जाण्यास वाहतुक विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे हडपसर उड्डाणपुलावरून जाणाऱ्या छोट्या वाहनांनी व जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिल्या आहेत,
पुणे महानगरपालिका हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गावर बांधण्यात आलेल्या हडपसर गांव ते गाडीतळ जाणारा उड्डाणपुल धोकायदायक झाला असल्याने दि. ०५/०२/२०२२ रोजीपासून वाहतूकीसाठी संपुर्ण बंद करण्यात आला होता व पुलावरुन जाणारी संपुर्ण वाहतूक सर्व्हिस रोडवरुन वळविण्यात आली आहे. पुलावरुन लोड टेस्ट करण्साठी कांही जड वाहने सोडुन तपासुनच निर्णय घेणार आहे.एकेरी सोलापुर ते पुण्याच्या उड्डाणपुलाचे अगोदर काम सुरु होणार आहे.पर्याय पुलाखालील रस्त्याचा वापर करावा.
सुनिल जाधव. पो.नि.हडपसर वाहतुक विभाग.
हडपसर उड्डाणपूल ची लोड टेस्टिंग करिता ४८ तासासाठी पुल बंद करण्यात आला आहे. मुंबई येथील एमएसआरडी ची कमिटी व तज्ञ यांच्या देखरेख खाली पाहणी करण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या मार्गाचे तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे.
श्रीनिवास बोनाला. विशेष प्रकल्प प्रमुख पालिका पुणे मनपा.